लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत शुक्रवारी लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठया काढून पार पडली. २०२५ ते २०३० या कालावधीतील गठीत होणा-या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत लातूर तालुक्यातील खुल्या प्रवर्गातील २८, नागरीकांचा मागास प्रवर्गातून १५, अनुसूचित जाती मधून ११, तर अनुसुचित जमाती मधून एका महिलेस आगामी पाच वर्षांत सरपंचपद भूषवण्याची संधी मिळणार आहे. जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंच पदाला खूप महत्व आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात लातूर लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत प्रसंगी उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे, तहसिलदार सौदागर तांदळे, नायब तहसिलदार गणेश सरोदो आदी उपस्थित होते.
नागरीकांचा मागास प्रवर्ग (पुरूष) : कव्हा, सेलू बू, मुरूड, बोरगाव बु., वाघोली, गांजूर ताडकी, हरंगूळ बू, वाघोली, टाकळी ब., सामनगाव, बिंदगीहाळ, रमजानपूर, धानोरी, खंडाळा, चिखुर्डा, चिंचोली ब., नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) : रायवाडी, येळी, भोसा, वरवंटी बसवंतपूर, आर्वी, निवळी, भोयरा, गोंदेगाव, वासनगाव, पिंपरी अंबा, शिराळा, सलगरा खु., मांजरी, ममदापूर, मसला, खुला प्रवर्ग (पुरूष) : शिरसी, धनेगाव, साखरा, माटेफळ, खंडापूर, टाकळगाव, बोरी, गंगापूर, हरंगूळ खू., उमरगा, बोपला, कातपूर, कासारखेडा, भडी, रामेगाव, महापूर, कानडी बोरगाव, चिंचोलीराववाडी, नांदगाव, कासारगाव हाणमंतवाडी, भाडगाव, बोरवटी, साई, तांदूळजा, वाडीवाघोली, बोकनगाव, चाटा,
खुला प्रवर्ग (महिला) : एकुरगा, खोपेगाव, भोईसमुद्रगा, भातांगळी, सावरगाव, चिकलठाणा, रामेश्वर, चिंचोलीराव, चांडेश्वर, बोडका वाकडी, बामणी, खाडगाव, वांजरखेडा, आखरवाई, शामनगर, गातेगाव, शिऊर, मुरूड आकोला, जवळा बु, कासारजवळा, शिवणी खु., अंकोली, गाधवड, कारसा, ढाकणी, खुलगापूर, नागझरी, हिसोरी या गावांचा समावेश आहे.
अनुसुचित जाती (पुरूष) : मुशिराबाद, जेवळी, सिकंदरपूर, सलगरा बु, सारसा, खुंटेफळ, करकट्टा, कृष्णनगर, महाराणाप्रतापनगर, पाखरसांगवी, रूईदिंडेगाव, ढोकी, अनुसुचित जाती (महिला) : भातखेडा, सोनवती, काटगाव, पेठ, सारोळा, कोळपा, तांदूळवाडी, पिंपळगाव अंबा, मळवटी, उटी खू, गुंफावाडी, अनुसुचित जमाती (पुरूष) : टाकळी शि., अनुसुचित जमाती (महिला) : बाभळगाव लातूर तालुक्यातील ११० सरपंच पदाच्या आरक्षण सोडत प्रसंगी तालुक्यातील नागरिक मोठया प्रमाणात बैठकीस उपस्थित होते.