22.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeअंतराळातील सूक्ष्म राक्षसाचे सुनीता विल्यम्स समोर आव्हान!

अंतराळातील सूक्ष्म राक्षसाचे सुनीता विल्यम्स समोर आव्हान!

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बच विल्मोर हे जून ६, २०२४ रोजी नवीन बोईंग स्टारलायनर अंतराळयानाद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. ते पृथ्वीवर परत येण्यापूर्वी अंतराळ स्थानकावर एक आठवडा राहणार आहेत. मात्र आता सुनीता विल्यम्स आणि इतर आठ सदस्यांच्या टीमसमोर एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे. या स्थानकावर आढळलेला ‘सुपरबग’ त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

अंतराळात घेराव असलेल्या या परिसरात एल्ल३ी१ङ्मुंू३ी१ ु४ँल्लीिल्ल२्र२ नावाचा हा अति-औषधप्रतिरोधी जंतु (सुपरबग) आढळला आहे. हा जंतु श्वसनसंस्थेवर परिणाम करतो.

अंतराळ स्थानकावर नेहमी अंतराळ कचरा आणि उल्कापिंडांची धास्ती असते, पण आता या सहप्रवासातून आलेले आणि गेल्या २४ वर्षात विकसित झालेले हे जंतु आणखी मोठी चिंता बनली आहे.

नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या डॉ. कस्तूरी रंगास्वामी यांनी या सुपरबगवर केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, पृथ्वीवरील जंतुंपेक्षा अंतराळात आढळलेले हे जंतु वेगळे असून त्यांच्यात उत्परिवर्तन झाले आहे. ते अधिक तग धरून राहण्याची क्षमता विकसित करून घेत आहेत.

या संशोधनात सहभागी असलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थान (ककळ) मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रामा म्हणाले, अतिशय कठीण परिस्थितींमध्येही वाढणारे जंतु आपल्यासमोर कोडे उभे करत आहेत.

जागतिक शास्त्रीय नियतकालिक ‘मायक्रोबायोम’मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार अंतराळवीरांच्या आरोग्यावर होणारा या सूक्ष्मजीवांचा प्रभाव तपासण्यासाठी अंतराळ स्थानकावरील सुक्ष्मजीवीय वातावरणाचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR