25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeमहाराष्ट्रअकोल्यात अपघात; २ ठार

अकोल्यात अपघात; २ ठार

अकोला : अकोला-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार दोन जण जागीच मरण पावले आहेत. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास अपघाताची घटना घडली.

अकोला-खामगाव या नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ट्रकला ओव्हरटेक करत असताना दुचाकीचे चाक या भेगांमधून गेले आणि अडकले. त्यानंतर मोटारसायकल स्लिप होऊन ट्रकवर आदळली. या अपघातात एकाचा ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने मृत्यू झाला, तर दुस-या व्यक्तीला देखील अपघातात जीव गमवावा लागला आहे. सचिन जुनारे आणि शाम महल्ले अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR