18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रअक्कलकोटमध्ये कार-टेम्पोचा भीषण अपघात; ४ ठार, ७ गंभीर

अक्कलकोटमध्ये कार-टेम्पोचा भीषण अपघात; ४ ठार, ७ गंभीर

अक्कलकोट : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच देवदर्शन घेऊन परत येणा-या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन दुस-या ठिकाणी जाणा-या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघतामध्ये ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ७ ते ८ जण जखमी असल्याचे समजते आहे. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अक्कलकोटमध्ये देवदर्शन घेऊन गणगापुरकडे जाणा-या भविकांचा अक्कलकोट तालुक्यात अपघात झाला आहे. चार चाकी गाडी आणि एका टेम्पोचा अपघात झाला. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये २ महिला व २ पुरुष हे जागीच ठार झाले. तर इतर ७ जण गंभीर जखमी असल्याचे समजते आहे. हे सर्व प्रवासी नांदेड जिल्ह्यातील असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत असून त्यांच्या नातेवाईकांशी देखील संपर्क साधण्यात आला आहे.

जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर दौंड तालुक्यातील वासुंदे येथे स्विफ्ट कारचा भिषण अपघात झाला. या अपघात वाहनचालकासह पाटस येथील विवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही माहिती दौंड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली. वाहन चालक अक्षय बाळासाहेब चव्हाण (रा. चिंचणी, ता. शिरूर), प्रीती विशाल भोसले (गवळी )(रा. पाटस ,ता.दौंड जि.पुणे) , असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

अक्षय आणि प्रिती हे दोघे ही पाटसवरुन बारामतीला स्विफ्ट कार मधून जात असताना वासुंदे गावच्या हद्दीत वाहनचालक अक्षय यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार ही रस्त्याच्या दुभाजकाला व नंतर पुलाच्या कठड्याला जाऊन जोरदार धडकली. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. आजूबाजूच्या नागरीकांना या अपघातात जखमी झालेल्या अक्षय व प्रीती बारामती येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले.

पराग शर्मा (वय २८, रा. चंदननगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री सिंग हे रिक्षाने जात होते. त्यांनी रिक्षा घेतली. भरधाव रिक्षा नगर रस्त्याने विरुद्ध दिशेने निघाली होती. समोर आलेल्या वाहनामुळे तसेच त्याचे भरधाव रिक्षावरील नियत्रंण सुटले आणि त्यांचा आगाखान पॅलेसजवळ रिक्षा उलटली. रिक्षातील प्रवासी धरमवीर सिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR