22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमनोरंजनअक्षय कुमारची राजकारणात एन्ट्री?

अक्षय कुमारची राजकारणात एन्ट्री?

मुंबई : अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षयचे सिनेमे म्हणजे सुपरहिट असे समीकरणच लागू आहे. गेल्या काही महिन्यांत अक्षयचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर इतकी चमक दाखवू शकले नाहीत.

अशातच अक्षयचा आगामी सिनेमा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ची उत्सुकता शिगेला आहे. अक्षय सध्या या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने सगळीकडे फिरत आहे. सिनेमांच्या सुपरहिट कारकीर्दीनंतर अक्षय यंदा लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा आहे.

गेल्या काही वर्षांपासून अक्षय राजकारणात प्रवेश करणार अशा बातम्या सुरू होत्या. पण या बातम्या निवळ अफवा आहेत, हे सिद्ध झाले. पण नुकत्याच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अक्षयला यंदा भाजपाकडून तिकिट मिळण्याची शक्यता आहे. अक्षय कुमारला दिल्लीतील चांदनी चौक भागातून लोकसभा निवडणुकीचे तिकिट मिळण्याची शक्यता आहे.

अक्षय कुमार गेली अनेक वर्षे भाजपाच्या कँपेनमध्ये दिसला. याशिवाय त्याने घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत सुद्धा चांगलीच गाजली. सध्यातरी अक्षय किंवा भाजपाकडून या बातमीचा खुलासा झाला नसला तरीही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अक्षय दिल्लीतील चांदनी चौकातून निवडणूक लढवताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR