सिन्नर : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज सिन्नरमध्ये आहे. यावेळी अजित पवार हे बुटेलवर मागच्या सीटवर बसले होते. बुलेटवर बसूनच ते सभेस्थळी गेले होते. सभेमध्ये बोलताना त्यांनी याबाबतचा किस्सा सांगितला आहे. सिन्नरमध्ये शेतकरी मेळाव्याला ते उपस्थित होते.
मी ब-याच दिवसांनी गाडीवर बसलो. मी मागे बसलो होतो. गाडी चालवली नाही. मी गाडी चालवली असती तर भलतेच झाले असते. हेल्मेट घातले, कायदा पाळला, लोक म्हणत होते हेल्मेट काढा. अजित पवार आहेत, लोकांना दिसलं पाहिजे.
मी दिसलो नाही तरी चालेल पण कायदा पाळला पाहिजे. आम्ही लोकांना सांगतो कायदा पाळा, म्हणून आम्हीही पाळला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
आम्ही राजे नाहीत, सेवक आहोत. मी ११ वर्षांचा असताना वडील वारले, मी खते वाहिली, धारा काढल्या. मी मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा पुतण्या असलो तरीही मी कष्ट केले आहेत. भावनिक होऊ नका, देशात राज्यात घटना घडल्या, काहीतरी चांगले होण्यासाठी चुका सांगा ना, चुका दुरुस्ती करणार, असे पवार म्हणाले.
जे टीका करतात मी त्यांना उत्तरं देणार नाही. लोकसभेसारखे विधानसभेला करू नका. लोकसभेत दुसरे बटन दाबले. आपल्याला योजना पाच वर्षे सुरू ठेवायच्या आहेत. निर्यात बंदी करण्यात आली होती. आम्ही दिल्ली सरकारला सांगितले आहे, यापुढे निर्यात बंदी नाही. जिथे अडचण येईल राज्य सरकार सहकार्य करेल, असेही ते म्हणाले.