मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुक लढविणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूकपूर्व हालचाली सुरू केल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २५ स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे.
प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी जाहीर केलेल्या यादीत पक्षाच्या २५ प्रमुख नेत्यांचा समावेश असून या भागातील निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. या यादीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यासह महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, एस. आर. कोहली, ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि जम्मू आणि काश्मीर प्रदेशाध्यक्ष डॉ. तारिक रसूल आदी प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.
काय म्हणाले ब्रिजमोहन श्रीवास्तव?
या अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये एक मजबूत आणि प्रभावी मोहिम राबवली जाणार आहे. सर्वसामान्य जनतेला भेडसावणा-या ज्वलंत समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच प्रयत्न करेल असा विश्वास ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.
स्टार प्रचारकांची यादी खालीलप्रमाणे
राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर कोहली, राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू आणि काश्मीर प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव, राष्ट्रीय सरचिटणीस आणि अल्पसंख्याक अध्यक्ष जलालुद्दीन, पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय सचिव श्रीमती रुही अंजुमन, कार्यकारिणी सदस्य पार्थ पवार, ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष उमाशंकर यादव, राष्ट्रीय मिडिया समन्वयक नवीन कुमार, युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष चैतन्य मानकर (सनी), अल्पसंख्याक विभागाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष फैज अहमद फैज, अल्पसंख्याक सेलच्या राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. मुमताज आलम रिझवी, जम्मू आणि काश्मीरचे अध्यक्ष डॉ. तारिक रसूल, अध्यक्ष एमएसएमई मोहम्मद इक्बाल, काश्मिरी पंडित वेलफेअर सेलचे अध्यक्ष अरुण रैना, सरचिटणीस फैयाज अहमद दार, उपाध्यक्ष हरिस ताहिर भट, सरचिटणीस फिरोज अहमद रंगराज, प्रदेश सरचिटणीस तौसीफ भट्ट, गांदरबल, राज्य सचिव संजय कौल, सदस्य इर्शाद अहमद गनी, सुश्री ऐशिया बेगम, सुश्री सलीमा अख्तर, आदींचा समावेश आहे.