22 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवारांना या घोषणेचा अर्थ लक्षात आला नाही

अजित पवारांना या घोषणेचा अर्थ लक्षात आला नाही

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेला विरोध केला आहे. मात्र, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना या घोषणेचा अर्थ लक्षात आला नाही, असा टोला लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली आहे. या घोषणेवरून राज्यात मोठा गदारोळ उठला होता. तर, भाजपचा मित्रपक्ष आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने मात्र, भाजपच्या या भूमिकेचे समर्थन केलेले नाही.

‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा अर्थ अजित पवारांच्या लक्षात आला नाही. जनभावना अजितदादांच्या लक्षात आली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. देशाचा इतिहास काय सांगतो. या देशात जेव्हा जेव्हा आमचा समाज जातींमध्ये वाटला गेला, प्रांतात वाटला गेला. किंवा विविध कारणांनी वाटला गेला तेव्हा आम्ही गुलामीत गेलो. देशही कटला, समाजही कटला आणि व्यक्तीही कटला. त्यामुळे ते सातत्याने सांगतात की हे जे राजकारण चालले आहे. जातीजातींमध्ये विभाजन करण्याचे, यापासून सावध राहा. एकत्र राहिलो तर शक्ती आहे, वाटले गेलो तर संपावे लागेल. याला चांगल्या शब्दांत मोदींनी सांगितले आहे की, एक है तो सेफ है , असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

‘बटेंगे तो कटेंगे’ याचा अर्थ काय हे मोदींनी देखील सांगितले आहे. आज ३५० जाती मिळून ओबीसी घटक आहे. ओबीसी आहेत म्हणून एक फोर्स आहे. तो ओबीसी जर ३५० जातींमध्ये विखुरला गेला तर फोर्स राहणार नाही. आदिवासी एसटी म्हणून फोर्स आहे. पण ५४ जाती त्यात आहेत. या जाती वेगळ्या झाल्या तर काय होईल?, असा सवालही फडणवीसांनी केला आहे.

दरम्यान, ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून भाजपमध्येही दोन मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे व भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही या घोषणांची गरज नाही असे म्हटले होत. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. पक्षातील कोणाला जर समजलं नसेल तर मी ही भूमिका समजावून सांगेन. बटेंगे ते कटेंगे, एक है तो सेफ है, ही पक्षाची भूमिका आहे, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR