15.6 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeराष्ट्रीयअधीर रंजन चौधरी यांच्याकडे काँग्रेसने सोपवली महत्वाची जबाबदारी

अधीर रंजन चौधरी यांच्याकडे काँग्रेसने सोपवली महत्वाची जबाबदारी

नवी दिल्ली : काँग्रेसने आज आपले ज्येष्ठ नेते तारिक अन्वर, अधीर रंजन चौधरी आणि तेलंगणाचे उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्क मल्लू यांची झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा सदस्य तारिक अन्वर, माजी खासदार अधीर आणि विक्रमार्क मल्लू यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.

निवडणूक आयोग आज महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी ५ जानेवारीला संपणार आहे.

झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सरकार आहे. झामुमोचे नेते हेमंत सोरेन सध्याचे मुख्यमंत्री आहेत. या सरकारमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाशिवाय लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडी आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR