28.6 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रअनुजा’ला ऑस्कर २०२५ चे नामांकन

अनुजा’ला ऑस्कर २०२५ चे नामांकन

मुंबई : ९७ व्या अकादमी पुरस्कारांसाठीची नामांकने आज जाहीर झाली. या ऑस्कर नॉमिनेशन २०२५ मध्ये भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून, प्रियंका चोप्रा आणि गुनीत मोंगा यांचा चित्रपट अनुजाला बेस्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले.
या कॅटेगरीमध्ये सुमारे १८० चित्रपटांपैकी फक्त ५ बेस्ट चित्रपटांना बेस्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले आहे. अनुजाबरोबर नामांकन मिळालेल्या चित्रपटांमध्ये एलियन, आय एम नॉट अ रोबॉट, द लास्ट रेंजप आणि अ मॅन हू वुड नॉट रिमेन सायलेंट या चित्रपटांचा समावेश आहे.

अनुजा ही एका ९ वर्षीय मुलीची गोष्ट आहे, जी एका कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये तिच्या बहिणीबरोबर काम करते. एका निर्णयामुळे तिचे आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य कसे बदलून जाते. अ‍ॅडम जे ग्रेव्हज यांनी दिग्दर्शित आणि सुचित्रा मट्टाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR