16.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रअनुसूचित जातींचे उपवर्गीकरण लांबले

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण लांबले

मुंबई : वृत्तसंस्था
अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करून मागासलेपणाच्या आधारे त्यांच्या जातींसाठीचे आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या न्या. अनंत बदर समितीने अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आठ महिन्यांची मुदतवाढ मागितल्याने उपवर्गीकरण लगेच लागू होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण संदर्भात निर्णय दिल्यानंतर महायुती सरकारने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय राज्यात लागू करण्यासंदर्भात समिती नेमली होती आणि तीन महिन्यांत अहवाल देण्यास सांगितले होते. समितीची मुदत १५ जानेवारीला संपली.

या मुदतीत समितीने अहवाल सादर केला नाही . केवळ अंतरिम अहवाल सादर केला आणि अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आठ महिन्यांची मुदत मागितली आहे.
१३ टक्के आरक्षणाचे वाटप : अनुसूचित जातींना १३ टक्के आरक्षण आहे. या प्रवर्गातील विविध जातींच्या मागासलेपणाचा अभ्यास करून त्या आधारे या १३ टक्के आरक्षणाचे वाटप करणे हा उपवर्गीकरणाचा मुख्य हेतू आहे. महायुती सरकारने पाच राज्यांत जाऊन या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अधिका-यांची एक समिती नेमली होती. या समितीचा अहवाल बदर समितीने घेतला आहे. या अहवालाचा उपयोग बदर समितीला होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR