24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमुख्य बातम्या‘अपराजिता’ विधेयकावर टीका; तरी भाजप देणार ममतांना पाठिंबा

‘अपराजिता’ विधेयकावर टीका; तरी भाजप देणार ममतांना पाठिंबा

 

कोलकाता : वृत्तसंस्था
महिला ट्रेनी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशभरात संतापाची लाट असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (बुधवार) अपराजिता विधेयक विधानसभेत मांडले. काही दिवस ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे पत्र पाठवून कठोर कायदा करण्याची मागणी केली होती. आता पश्चिम बंगालमधील नव्या विधेयकामध्ये बलात्काराच्या आरोपींना १० दिवसांत फाशी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यावर भाजपने हे घाईघाईत आणलेले विधेयक असल्याची टीका केली आहे.

ममता यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. याच्या दुस-या दिवशी हे विधेयक मांडण्यात आले आहे. एकंदरीत राज्य सरकारविरोधातील जनतेत असलेला रोष कमी करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे. पीडितेला न्याय मिळण्याबरोबरच दोषींना तात्काळ आणि कठोर शिक्षा देणे हा या विधेयका मागचा उद्देश आहे.

बलात्कार विरोधी विधेयकाचे नाव अपराजिता महिला आणि बालक (पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा आणि सुधारणा) विधेयक २०२४ असे या विधेयकाचे नाव आहे. आजच हे विधेयक मंजूर केले जाणार असून विरोधी पक्ष भाजप देखील या विधेयकाला पाठिंबा देणार आहे. यानंतर हे विधेयक राज्यपालांकडे पाठविले जाणार आहे.

दरम्यान, या विधेयकावरून विधानसभेत गोंधळ सुरु झाला आहे. ममता बॅनर्जी सरकारने सादर केलेल्या बलात्कारविरोधी विधेयकावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. भाजपला या विधेयकात काही दुरुस्त्या हव्या आहेत, पण ममता सरकारला हे विधेयक सध्या आहे त्या स्वरूपात मंजूर करायचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR