21.2 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeअब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला...

अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला…

 

चेन्नई : वृत्तसंस्था
जसप्रीत बुमराहने शुक्रवारी चेन्नईच्या एम.ए. चिदम्बरम स्टेडियमवर खास विक्रमाला गवसणी घातली. फिरकीसाठी नंदनवन असलेल्या चेपॉकच्या मैदानात भारताच्या ताफ्यातील जलगती गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० विकेट्सचा टप्पा पार केला. ज्या बांगलादेशच्या गोलंदाजाने भारतीय संघाविरुद्ध पंजा मारला त्या हसन महमूदला आउट करत बुमराहने ४०० चा टप्पा गाठला.

बुमराहची विक्रमाला गवसणी : चेन्नईच्या मैदानातील कसोटी सामन्यात बांगलादेशच्या पहिल्या डावातील पहिल्या षटकातच बुमराहने पहिली विकेट घेतली होती. एका अप्रतिम चेंडूवर त्याने शादाम इस्लाम याला क्लीन बोल्ड करत या कसोटी सामन्यात आपल्या विकेटचे खाते उघडले. त्यानंतर मुशिफिकूर रहिमला त्याने लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. विराट कोहलीच्या कॅचच्या मदतीने बुमराहने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तिसरी विकेट मिळवली. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ४०० विकेट्सचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा सहावा जलदगती गोलंदाज ठरला आहे.

जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये वनडे क्रिकेटमधून टीम इंडियात पदार्पण केले होते. वनडेसह तो टी-२० आणि कसोटी संघाचा प्रमुख भाग आहे. वनडेत त्याच्या खात्यात १४९ विकेट्स जमा आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ८९ बळी टिपले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी त्याच्या खात्यात कसोटीत १५९ विकेट्सची नोंद होती. चेन्नईतील तिघांना तंबूचा रस्ता दाखवत त्याने ४०० विकेट्सचा टप्पा गाठला.

४०० किंवा अधिक विकेट घेणारे गोलंदाज
कपिल देव – ३७३ डावात ६८७
झहीर खान- ३७३ डावात ५९७
जवागल श्रीनाथ- ३४८ डावात ५५१
मोहम्मद शमी- २४५ डावात ४४८
इशांत शर्मा- २८० डावात ४३४
जसप्रीत बुमराह- २२७ डावात ४००

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR