28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनअभिनेत्री कश्मिरा शाहचा भीषण अपघात

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भीषण अपघात

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री कश्मिरा शाहचा भीषण अपघात घडल्याची बातमी समोर येत आहे. कश्मिराने स्वत: सोशल मीडियावर तिच्या अपघातासंबंधी बातमी शेअर केली आहे.
कश्मिराने फोटो शेअर करताच चाहत्यांना तिची काळजी वाटली. कारण कश्मिराचे कपडे रक्ताने माखलेले दिसले. सुदैवाने मोठी हानी टळून कश्मिरा या अपघातात बचावली आहे.

कश्मिरा सध्या लॉस एंजेलिस शहरामध्ये होती. तिचा पती आणि अभिनेता कृष्णा अभिषेक मुलांसह ७ नोव्हेंबरला भारतात परतला. अशातच प्रवास करताना कश्मिराचा अपघात झाला. कश्मिराने रक्ताने माखलेल्या कपड्यांचे फोटो पोस्ट करून तिच्या अपघाताविषयीची बातमी सर्वांना सांगितली. कश्मिराने लिहिलेय की, मला वाचवण्यासाठी देवाचे आभार. खूप भयानक घटना होती. काहीतरी मोठे घडले असते. परंतु थोडक्यात निभावले. जखमेच्या खुणा राहणार नाहीत याची मला आशा आहे. प्रत्येक क्षण जगा. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येतेय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR