24.3 C
Latur
Friday, September 27, 2024
Homeमहाराष्ट्रअमित शहांना गडकरी, शिंदेंच्या विकासावर विश्वास नाही का?

अमित शहांना गडकरी, शिंदेंच्या विकासावर विश्वास नाही का?

अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौ-यादरम्यान नाशिक येथे जात असताना त्यांच्या ताफ्याने रस्त्यावर पाणी साचल्याचे पाहून वाट वाकडी केली होती. यावेळी अमित शहांना गडकरी, शिंदेंच्या विकासावर विश्वास नाही का?असे म्हणत एका वृत्तवाहिनीचा व्हीडीओ एक्सवर पोस्ट करत अतुल लोंढे यांनी सरकारवर खोचक टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या मुलाखतीत आम्ही रस्त्यांची कामं करत असल्याचे म्हटले होते. ‘‘स्वत: मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून कामं पाहतो. यावर्षी कुठं पाणी साचलेलं तुम्ही पाहिलं का? मला फिल्डवर उतरून काम करायला लाज वाटत नाही’’, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र त्याचदरम्यान रस्त्यावर पाणी साचल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्याने आपली वाट बदलल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक व्हीडीओ शेअर करत महायुती सरकारवर टीका केली.

यावेळी एका वृत्तवाहिनीचा व्हीडीओ एक्सवर पोस्ट करत अतुल लोंढे यांनी सरकारवर खोचक टीका केली. ते म्हणाले, अमित शहा यांना नितीन गडकरी आणि एकनाथ शिंदे यांच्या विकासावर विश्वास नाही का? शहा यांचा ताफा रस्त्याच्या कडेने निघून गेला. रस्त्याच्या मधून गेले असते तर त्यांना कदाचित विकास दिसला असता.’’

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR