28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनअमिर खानचा ‘गजनी २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला?

अमिर खानचा ‘गजनी २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला?

मुंबई : आमिर खानच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. ताज्या माहितीनुसार, आमिर खान चाहत्यांसाठी लवकरच ‘गजनी २’ चित्रपटाची घोषणा करणार आहे. २००८ साली प्रदर्शत झालेल्या गजनी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.

सध्या आमिर खान ‘कुली’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात आमिर खान रजनीकांतसोबत काम करताना दिसणार आहे. २०२२ साली आलेला ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिर खान चित्रपटातून जवळपास गायबच झाला होता. यामुळे तो बॉक्स ऑफिसवर जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे.

मिळालेल्या बातमीनुसार अभिनेता आमिर खान सध्या ‘गजनी २’ च्या कथेवर काम करत आहे. ‘गजनी २’ साठी आमिर खानने दिग्दर्शक लोकेश कनागराज आणि अल्लू अजुर्नाचे वडील अल्लू अरविंद यांच्याशी हातमिळवणी केली आहे, जे दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठा चित्रपट निर्माते म्हणून ओळखला जातात. दोघेही ‘गजनी २’ च्या कथेवर एकत्र काम करत आहेत. यामुळे आमिर खान लवकरच ‘गजनी २’ या चित्रपटाबाबत घोषणा करू शकतो असे सांगितले जात आहे.

आमिर खान २०२५ मध्ये प्रदर्शित होणा-या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात व्यस्त आहे. याशिवाय आमिर खान राजकुमार संतोषी यांच्या ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटातही काम करत आहे. यासोबतच आमिर ‘कुली’ आणि ‘कैथी २’ मध्ये ही झळकणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR