19.3 C
Latur
Saturday, November 9, 2024
Homeउद्योगअमेरिकेत मंदीचे थैमान; ८ महिन्यांत ४५२ कंपन्या दिवाळखोर!

अमेरिकेत मंदीचे थैमान; ८ महिन्यांत ४५२ कंपन्या दिवाळखोर!

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेतील हजारो छोट्या-मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत. वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत देशातील ४५२ बड्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्याची माहिती समोर आली. गेल्या १४ वर्षांतील हा इतक्या प्रमाणात कंपन्या दिवाळखोरीत गेल्याचा हा दुसरा सर्वाधिक आकडा आहे.

२०२० मध्ये जेव्हा कोरोनाने थैमान घातले तेव्हा वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत म्हणजेच ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनमुळे ४६६ कंपन्या दिवाळखोर झाल्या होत्या. यावर्षी ऑगस्टमध्ये ६३, तर जुलैमध्ये ४९ कंपन्या दिवाळखोरीत गेल्या. ऑगस्ट हा गेल्या चार वर्षांतील अमेरिकी उद्योगासाठी चौथा सर्वात वाईट महिना होता.

सेक्टरनुसार सांगायचे झाले तर अमेरिकेत सर्वाधिक फटका हा कंझ्युमर डिस्क्रेशनरी सेक्टला बसला. यातील ६९ मोठ्या कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला. यानंतर इंडस्ट्रियल सेक्टरचा क्रमांक येतो. यातील ५३ कंपन्या दिवाळखोर झाल्या, तर हेल्थकेअर विभागातील ४५ कंपन्या दिवाळखोरीत गेल्या. कोरोनानंतरही पहिलीच अशी वेळ आहे, जेव्हा अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावल्याचे दिसत आहे. देशात मंदीच्या शक्यतेसोबतच विक्रमी संख्येत कंपन्या दिवाळखोरीत जाण्याचीही शक्यता आहे. देशात बेरोजगारीही वाढली आहे ग्राहक खर्चातही घसरण झालेली दिसत आहे.

१५ वर्षात किती कंपन्या बंद झाल्या?
२०१० मध्ये अमेरिकेत ८२७ मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्या. तेव्हा अमेरिकेची अर्थव्यवस्था २००८ च्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपडत होती. २०११ मध्ये देशात ६३४ कंपन्या दिवाळखोरीत गेल्या, तर २०१२ मध्ये ही संख्या ५८६ होती. २०१३ मध्ये ५५८, २०१४ मध्ये ४७१, २०१५ मध्ये ५२४, २०१६ मध्ये ५७६, २०१७ मध्ये ५२०, २०१८ मध्ये ५१८, २०१९ मध्ये ५८९, २०२० मध्ये ६३८, २०२१ मध्ये ४०६, २०२२ मध्ये ३७२ आणि २०२३ मध्ये ६३४ कंपन्या दिवाळखोरीत गेल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR