22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरअवैध वाळू तस्करी; ६४.४० लाखांचा ऐवज जप्त

अवैध वाळू तस्करी; ६४.४० लाखांचा ऐवज जप्त

लातूर : प्रतिनिधी
वाळू तस्करी रोखण्याच्या दृष्टीकोनातून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी स्पष्ट ताकीद देताच स्थानीक गुन्हे शाखेने शिरूर अनंतपाळ पोलीस ठाणे अंतर्गत गिरकचाळ शिवारात नदीपात्रात अडगळीच्या ठिकाणी अवैध वाळू साठा व वाळू उपसासाठी पाच लोखंडी बोटीसह ६४.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सुमारे पंधरा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सूचना दिल्या त्या-त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दि. ६ ऑगस्ट रोजी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मध्ये अवैधपणे वाळूचा उपसा करून,चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवणूक करून मांजरा नदी पात्राच्या परिसरात आडगळीच्या ठिकाणी लपवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाने महसूल विभागाला सोबत घेऊन मौजे गिरकचाळ तालुका शिरूर आनतपाळ येथील मांजरा नदीच्या पात्रालगत मोकळ्या जागेमध्ये मांजरा नदीपात्रातून लोखंडी बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या शासकीय परवानगी शिवाय वाळूचा उपसा करून अंदाजे १ हजार ११० ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेले पाच लोखंडी बोटी असा एकूण ६४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
वाळूचे अवैध उत्खनन करून विना परवाना चोरटी विक्री व्यवसायसाठी साठवणूक करणारे भगवान भाऊराव शिंंदे, भगवंत भाऊराव शिंदे, धनु बाबुराव शिंदे, शरद बाबुराव शिंदे, ईश्वर नागोराव शिंदे सर्व रा. गिरकचाळ, ता. निलंगा, जि. लातूर यांच्यासह इतर आठ ते दहा लोकांविरुद्ध पोलीस ठाणे शिरूर आनतपाळ येथे कलम ३०३ (२) ३ (५) भारतीय न्याय संहिता व कलम ४८ (७) ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलीस अमलदार विनोद चिलमे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR