25.3 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeराष्ट्रीयआंध्रात विजय मिळवून चंद्राबाबू पुन्हा केंद्रात झाले किंगमेकर

आंध्रात विजय मिळवून चंद्राबाबू पुन्हा केंद्रात झाले किंगमेकर

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशात टीडीपीच्या एकतर्फी विजयाने चंद्राबाबू नायडू केंद्रातही किंगमेकर बनले आहेत. लोकसभेच्या २५ पैकी १६ जागा जिंकून टीडीपी एनडीएमध्ये दुस-या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.

एकहाती बहुमताच्या आकड्यापासून भाजप दूर राहिल्यामुळे दिल्लीतील सत्तेची चावी पुन्हा चंद्राबाबू नायडूंच्या हाती आली आहे. अशा स्थितीत आंध्र प्रदेशातील चंद्राबाबूंचा विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे.

दुसरीकडे, २०१९ मध्ये प्रचंड विजय मिळवणा-या वायएसआरसीपीचा दारुण पराभव करून लोकांनी मोफतचे राजकारण नाकारले आहे. असा दावाही चंद्राबाबूंनी केला. चंद्राबाबू नायडू आणि अभिनेते-राजकारणी पवन कल्याण आणि जातीय समीकरण यांच्या संयोजनानेही एनडीएच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. २०१९ मध्ये आपले खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या भाजपने यावेळी दक्षिणेत दिग्गजांच्या मदतीने राज्यात कमळ फुलवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR