22.8 C
Latur
Thursday, February 22, 2024
Homeसोलापूरआगामी विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी आवाज उठवू : आगामी विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी...

आगामी विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी आवाज उठवू : आगामी विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी आवाज उठवू : आमदार सुभाष देशमुख

सोलापूर : मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघावा यासाठी पुन्हा एकदा आपले आंदोलन सुरु केले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदार व सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना भेटून आगामी विशेष अधिवेशनात आमदारानी मराठा आरक्षणावर भाष्य करुन सगेसोयरेसह आवाज उठवून ते मंजूर करुन घ्यावे, यासाठी स्थानिक पातळीवर आमदाराची भेट घ्यावी, अशा सुचना दिल्या आहेत.

याचाच एक भाग म्हणून दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेऊन त्यांनी विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण सगेसोयरे यावर आपले मत व्यक्त करत आरक्षण मंजूर करून घ्यावे याबाबतचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आले. यावेळी दोन्ही आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत आगामी विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही मराठा क्रांती मोर्चाला दिली.

यावेळी मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वयक दास शेळके, सुनील रसाळे, शेखर फंड, सुनील हुंबे, निलेश शिंदे, बाबा शेख, गणेश शिंदे, बाळासाहेब पवार, संजय घाडगे, श्रेयस बोग्गे आणि समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR