24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरआजारी मित्रास वर्गमित्रांची ५१ हजारांची मदत

आजारी मित्रास वर्गमित्रांची ५१ हजारांची मदत

निलंगा : प्रतिनिधी
शहरातील अंकुश सातपुते हे गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सर रोगाने त्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, हलाखीची परिस्थिती असल्यामुळे उपचाराचा खर्च न परवडणारा आहे. मित्र आजारी असल्याचे समजल्यानंतर दहावीच्या वर्गमित्रांनी एकत्र येऊन आजारी मित्रास ५१ हजारांची मदत केली.
        १९९३ सालीची दहावी बॅचच्या ‘आठवणीतील शाळा’ या व्हाट्सअप ग्रुप  वर्गमित्रांनी काढला. यातील अंकुश सातपुते हे आजारी पडल्याचे समजले. ते कॅन्सरने आजारी असल्याचे त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याचे कळल्यानंतर सर्व वर्ग मित्रांनी त्याची भेट घेत ५१ हजार रुपयांची मदत त्यांच्या पत्नीकडे  सुपूर्द केली. १० वी होऊन ३० वर्षानंतर हे मित्र आपल्या मित्राच्या काळजीपोटी मला भेटायला आले हे बघून अंकुशच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, मित्र भेटल्यामुळे आजारातून बरे  व्हायला मला बळ मिळाले, अशी भावना त्यानी व्यक्त केली . सोशल मीडिया हे केवळ करमणुकीचे साधन नसून त्याद्वारे दूर राहूनही आपल्या माणसाची काळजी, त्याच्या सुख दु:खात सहभागी होता येते  असा आदर्श  या वर्गमित्रांनी समाजासमोर ठेवला आहे. दहावीच्या या बॅचचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी अमोल आर्य,माधव गाडीवान, सुभाष काडादी, उद्धव जाधव,संजय चौधरी, युवराज जाधव, दिनेश रेशमे, किरण झंवर, सोमनाथ कमलापुरे, दत्ता सातपुते, सुनील भागवत, सविता कोसगी, उषा पाटील, सुनिता फट्टे, करुणा बाबर, प्रकाश सोलापूरे, शिवानंद दवणे, राजेश्वर रुपनर, उद्धव मोरे, सचिन दाताळ, मुकेश पांचाळ, सुनिल जाधव, प्रशांत हतागळे, किशन जाधव, किशोर मोहोळकर, शमशाद शेख, परमेश्वर माने, अनिल पाटील, सीमा कानेगावे, शिवाचिंंचोलकर, राजेंद्र सूर्यवंशी, शिवाजी पवार, सुवर्णा पाटील, कैलास कांबळे, राजू हतागळे, संजय राठोडे, राजकुमार मिरकले, दिपक माने, सुधाकर म्हेत्रे, मीना पांचाळ, मंगेश गुरमे, बालाजी माळी, संग्राम शेटकार, हाफिज शेख आदी मित्र उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR