22.2 C
Latur
Thursday, July 25, 2024
Homeलातूरआत्महत्याग्रस्त शिंदे कुटूंबियांची जरांगे यांनी घेतली भेट 

आत्महत्याग्रस्त शिंदे कुटूंबियांची जरांगे यांनी घेतली भेट 

लातूर : प्रतिनिधी
आर्थिक व बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केलेले भिमाशंकर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे या येथील गायत्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी गायत्री हॉस्पिटलमध्ये जाऊन आशा शिंदे यांची भेट घेऊन प्रकृतीची अस्थेवाईकपणे चौकशी केली.
आत्महत्या केलेले भिमाशंकर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे या येथील गायत्री हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार घेतल आहेत. मराठा आरक्षण जनजागृती शांतता रैलीनिमित्त मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील मंगळवारी लातूर शहरात मुक्कामी होते. बुधवारी सकाळी धाराशिवला जाताना त्यांनी गायत्री हॉस्पिटलमध्ये जाऊन आशा शिंदे यांची भेट घेतली या वेळी त्यांनी गायत्री हॉस्पीटलचे संचालक व प्रसिद्ध श्वसनविकार तज्ञ डॉ. रमेश भराटे यांच्याशी आशा शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR