27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरआदर्श मैत्री फाऊंडेशनने मातोश्री वृद्धाश्रमात आजी-आजोबासोबत साजरी केली रंगपंचमी

आदर्श मैत्री फाऊंडेशनने मातोश्री वृद्धाश्रमात आजी-आजोबासोबत साजरी केली रंगपंचमी

लातूर : प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मातोश्री येतील वृद्ध ६५ आजी-आजोबासोबत रंग खेळून गाण्याच्या तालावर नृत्य करत आजी-आजोबांना आनंद देऊन रंगपंचमी साजरी करण्याचा अनोखा उपक्रम आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने शनिवार दि. ३० मार्च रोजी करण्यात आला. आदर्श मैत्री फाऊंडेशन नेहमीच वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजातील दुर्लक्षित घटकासाठी मदतीचा हात देण्याचे त्यांच्या चेह-यावर स्मित हास्य उमलबिण्याचे काम करत असते त्याचाच एक भाग म्हणून गेल्या चार वर्षापासून मातोश्री येथील वृद्धाश्रमात आजी-आजोबा सोबत रंगपंचमी साजरी करत त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचे काम आदर्श मैत्री फाऊंडेशन च्या माद्यमातून करण्यात आले.
या वेळी फाडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, नायब तहसीलदार गणेश सरवदे, एपीआय दयानंद पाटील,   प्रा. शिवराज मोठेगावकर, तुकाराम पाटील, शशिकांत पाटील, निलेश राजमाने, सोनू डगवाले, बाबुराव जाधव, सच्चिदानंद ढगे, विवेक ढगे,  इस्माईल शेख , राजेश मित्तल, विवेक सौताडेकर, उत्तम देशमाने, प्रवीण सूर्यवंशी, अमोल जानते, महादेव पांडे, प्रमोद टेकले, तेजस शेरखाने, आनंद सूर्यवंशी, प्रमोद भोयरेकर, श्रीकांत हिरेमठ, सुदाम पवार, होनराव, निकम, अभिषेक बिराजदार, नरसिंग कापसे व मातोश्री वृद्धाश्रम येथील आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR