लखनौ : सपा अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की आमची मागास, दलित आणि अल्पसंख्याक (पीडीए) रणनीती २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाली. आम्ही जनतेचे प्रश्न मांडले. यामुळे भाजपचे नकारात्मक राजकारण संपले. सपाच्या संसदीय मंडळाची बैठक आज लखनौमध्ये पार पडली. या बैठकीत अखिलेश यादव बोलत होते. या बैठकीला पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यूपीमध्ये इंडिया आघाडीला ४३ जागा मिळाल्यामुळे सपा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे.
दरम्यान, अखिलेश यादव करहाल विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा देणार की कन्नौजची जागा सोडणार याचा निर्णय बैठकीतच घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना या दोनपैकी एक जागा सोडावी लागणार आहे. ते आज होणा-या सपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय राजकारण पुढे नेण्याचे काम करणार की राज्याला बळकट करण्याचा निर्णय घेऊ शकतात. यानंतर या बैठकीत अखिलेश यादव यांचे पुतणे माजी खासदार तेज प्रताप यादव आणि काका राष्ट्रीय सरचिटणीस शिवपाल सिंह यादव यांच्या जबाबदा-या ठरविण्यात येणार आहेत.