22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रआमच्या सुप्रियालाही पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त मताधिक्य

आमच्या सुप्रियालाही पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त मताधिक्य

बारामती : प्रतिनिधी
नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालात राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. अजित पवार गटाला फक्त एकच जागा जिंकता आली. देशाचे पंतप्रधान दीड लाख मतांनी निवडून आले आणि सुप्रिया दीड लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आली. देशाच्या पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या आहेत,असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ सर्वांत चर्चेत आला. बारामतीच्या जनतेने सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक मताधिक्य देत जिंकवले. याच विजयाबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना देशाच्या पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या आहेत, असे म्हणत बारामतीतील विजयाचे कोडे सांगितले आहे.

इतिहासाचा दाखला देत ते म्हणाले,१९६७ साली मला कठीण काळात विजयी केले. सोमेश्वर कारखान्याचे बाबूलाल काकडे यांच्या विरोधात मला निवडून दिले.
ते पुढे म्हणाले, आजची निवडणूक ही सुप्रिया सुळे यांची चौथी निवडणूक असताना देखील प्रचंड मतांनी विजयी केले. बारामतीमधील जनतेला कोणते बटन दाबायचे हे सांगावं लागत नाही. देशाचे पंतप्रधान दीड लाख मतांनी निवडून आले आणि सुप्रिया दीड लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आली. देशाच्या पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR