लातूर : प्रतिनिधी
महाशिवरात्रीनिमित्त लातूर तालुक्यातील नागझरी येथील श्री नागोबा मंदिरास भेट देऊन ‘लातूर ग्रामीण’चे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी (दि. ८) मनोभावे पूजन केले. त्यानंतर आखरवाई (ता. लातूर) येथील मंदिरात जाऊन भक्तीमय वातावरणात महादेवाचे दर्शन घेतले व आरती केली उपस्थित सर्व ग्रामस्थांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.