23.3 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरआमदार धिरज देशमुख यांनी नवी परंपरा सुरु करून इतरांना दिली प्रेरणा

आमदार धिरज देशमुख यांनी नवी परंपरा सुरु करून इतरांना दिली प्रेरणा

लातूर : प्रतिनिधी
सर्वसाधारणपणे वाढदिवसाच्या निमित्ताने आई मुलाचे औक्षण करत असते परंतु कधी मुलांनी आईचे औक्षण करुन शुभेच्छा दिल्याचे आपण पाहिले नव्हते. ते आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त आईचे औक्षण करुन इतरांना प्रेरणा दिली.
२०१९ साली लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी आई (श्रीमती वैशालीताई) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे औक्षण केले होते. औक्षण करतानाचा तो क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. असंख्य लोकांनी या कृतीचे कौतुक देखील केले होते. आईच्या प्रती आपली असलेली श्रद्धा व प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त करण्याची ही पद्धत डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी याचे अनुकरण केले. आईच्या वाढदिवसानिमित्त औक्षण करुन अनेकांनी शुभेच्छा दिल्याचे आपण अनेकदा पाहीले व ऐकले आहे.
आई आणि मुलाचं असलेल्या नात्यास अधिक घट्ट करत एक नवी परंपरा यातून सुुरु झाली. दि. १० ऑक्टोबर रोजी आपल्या बाभळगाव निवासस्थानी माजी मंत्री आमदार अमित देशमुख व आमदार धिरज देशमुख यांनी श्रीमती वैशालीताई देशमुख यांचे औक्षण करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार धिरज देशमुख यांच्या व्यक्त्तिमत्वातचा हा पैलू सर्वांना मनापासून भावला असून एक नवी परंपरा व चांगली संस्कृती रुजवण्याचे काम आमदार धिरज देशमुख करत असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR