लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांना पुन्हा लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी, असा एकमुखी ठराव रेणापूर तालुक्यातील काँग्रेसच्या वतीने गुरुवारी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याला उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी समर्थन दिले आहे. तसा ठराव जिल्हा काँग्रेस व प्रदेश कमिटीकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
रेणापूर येथे तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व विविध संस्थांचे पदाधिकारी यांची गुरुवारी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी असा ठराव मांडण्यात आला. त्या ठरवायला सर्वांनमुते मंजुरी देण्यात आली.
बैठकीला रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, लातूर ग्रामीणचे काँग्रेस निरीक्षक तथा जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक पाटील पद्म पाटील, उमेश सोमानी, बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंगरे, उपसभापती शेषराव हाके, गोविन्द देशमुख, स्रेहल देशमुख, धनराज देशमुख, पंडितराव माने, पूजा ईगे, अनिल पवार, हणमंत पवार, हाके, भूषन पनुरे, विभिशन कदम, विलास राठोड सचिन ईगे, महादेव बरिदे, अजय चक्रे, पाशामिया शेख, रामंिलग जोगदंड, तालुक्यातील विविध सोसायटीचे चेअरमन, सरपंच, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध काँग्रेस सेलचे, संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच आज रेणापूर येथे झालेल्या बैठकीत लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले डॉ. शिवाजीराव काळगे यांनी विजय प्राप्त केला. त्या विजयासाठी मार्गदर्शन करणारे राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांचेही या बैठकीत अभिनंदनाचे ठराव घेण्यात आले.