विधान परिषदेचे सभापती किंवा मंत्रीपदाची धुरा?
अहिल्यानगर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक निकालातून सा-यांनाच अचंबिक करणारे आकडे समोर आले. आता एका पराभव झालेल्या उमेदवाराची आता तीन पदासांठी चर्चा आहे. मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांचे नीकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून ओळख असलेले विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांची विधान परिषदेचे सभापती, भाजपचे प्रदेशाध्यक्ष किंवा मंत्री अशा तीन पदांसाठी नाव चर्चेत आणि आघाडीवर आहे.
प्रा. शिंदे यांनी यापूर्वी सलग दोन वेळा कर्जत-जामखेड मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. २०१९ मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. २०२४ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दुस-यांदा शिंदे यांचा पराभव केला. मात्र, यावेळी पवार यांचे मताधिक्य कमालीचे घटले.
दरम्यान, पराभव झाल्यानंतरही आमदार शिंदे यांचे नाव तीन पदांसाठी चर्चेत आहेत. भाजपकडून त्यांना लवकरच मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येते. विधान परिषदेचे सभापती, भाजपचे प्रदेशाध्यक्ष किंवा मंत्री यापैकी एक पद त्यांना मिळू शकते. शिंदे मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. २०१४ मध्ये शिंदे सुरवातील राज्यमंत्री होते. तेव्हा फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्यांचाच राज्यमंत्री म्हणून पदभार शिंदे यांच्याकडे होता.