23.3 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रआम्ही सगळे तुमच्याबरोबर....

आम्ही सगळे तुमच्याबरोबर….

मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना व्हीडीओ कॉल

मुंबई : प्रतिनिधी
आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त आल्याने याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट अण्णा हजारे यांना व्हीडीओ कॉल करून त्यांच्याशी संवाद साधला. हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी अण्णा हजारेंना हा व्हीडीओ कॉल कशासाठी केला याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजित पवार यांना घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे. पोलिसांनी या संदर्भातील क्लोजर रिपोर्ट कोर्टात देखील सादर केला.

अजित पवार यांच्या शिखर बँक घोटाळ्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजित पवार यांच्यासंदर्भात कोर्टात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली होती. त्यानंतर अण्णा हजारे यांनी याबाबत भाष्य केले. या प्रकरणात आक्षेप कोणी घेतला हेच आपल्याला माहीत नाही असे अण्णा हजारेंनी म्हटले आहे. शिखर बँक घोटाळ्याला चौदा वर्षे झाली.

त्यामुळे त्याचे काय झाले मला काहीही कल्पना नाही. काल माझे नाव समोर आले. माझे नाव बघून मला धक्का बसला. माझ्या नावाचा दुरुपयोग करून काही लोक स्वार्थ साधतात. अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका. लोकांना माहीत असेल तर बोलतील. मला यातले काही माहीतच नाही मग कसे बोलणार, असे अण्णा हजारेंनी म्हटले आहे.

त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट अण्णा हजारे यांना व्हीडीओ कॉल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना व्हीडीओ कॉलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक व्हीडीओ देखील एक्स सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR