22.1 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeलातूरआरटीईच्या प्रवेशाकडे १०८ विद्यार्थ्यांची पाठ

आरटीईच्या प्रवेशाकडे १०८ विद्यार्थ्यांची पाठ

लातूर : प्रतिनिधी
आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गात २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी तिस-या यादीतील प्रवेशाची प्रक्रीया पूर्ण झाली. तिस-या यादीतील प्रवेश पात्र १०८ विद्यार्थ्यांनी सोयीची शाळा नसणे आदी कारनामुळे ते प्रवेशासाठी शाळेकडे फिरकलेही नाहीत. तिस-या यादीत ८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी लातूर जिल्हयातील स्वंय अर्थसहित २१५ शाळांची नोंदणी झाली होती.या शाळेत १ हजार ८६५ जागेवर मोफत प्रवेश घेण्यासाठी लातूर जिल्हयातील ५ हजार ७६२ पालकांनी पाल्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी १ हजार ७९६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची लॉटरी लागली होती. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पहिल्या यादीतील १ हजार ११७९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. प्रवेश शिल्लक राहिल्याने दुस-या यादीतील ५३५ जागेसाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात आली. या दुस-या यादीत २५६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले.

तसेच तिस-या यादीतील प्रवेशाचा कालावधी दि. १४ सप्टेंबर रोजी संपला. पालकांना मुदतवाढ देवूनही ८९ पालकांनी प्रवेश घेतले. शाळा सोयीची नसणे, कांही पालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश दुस-या शाळेत घेतल्याने सदर १०८ पालक प्रवेशासाठी तालुकास्तरीय समितीकडेही फिरकले नाहीत. कदाचित ही मोफत प्रवेशाची शेवटची यादी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोफत प्रवेशाच्या १ हजार ८६५ जागेपैकी आज पर्यंत १ हजार ५२४ प्रवेश झाले आहेत. तर यावर्षी ३४१ प्रवेशाच्या जागा शिल्लक राहणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR