15.7 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeसोलापूरआरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यात २८९ शाळांची नोंदणी

आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यात २८९ शाळांची नोंदणी

राखीव जागांवरील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरवात

सोलापूर : बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क कायांतर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्ष २०२५ —२६ मधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील २८९ शाळांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकाकरिता राखीव जागांवरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर १८ ते ३१डिसेंबर या कालावधीत शाळांच्या ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर शनिवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

येत्या शैक्षणिक वर्षांसाठी सोलापूर जिल्ह्यातून स्वयंअर्थसाहित ३०० शाळा प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आल्या होत्यायापैकी २८९ शाळांनी २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. या नोंदणी केलेल्या शाळांत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश देण्यात येणार आहे

सोलापूर जिल्ह्यात ४८९ स्वंयअर्थसाहित शाळा आहेत. यापैकी १८९ शाळा अल्पसंख्याक
दर्जाच्या आहेत. एकूण ३०० शाळा २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी पात्र ठरविल्या
होत्या. त्यापैकी २८९ शाळांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.नोंदणीनंतर शाळांची पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणी करताना बंद केलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळा, अनधिकृत आणि स्थलांतरित झालेल्या शाळा याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR