27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeक्रीडाआरसीबीच्या श्रेयंकाला चाहत्याने केले प्रपोज

आरसीबीच्या श्रेयंकाला चाहत्याने केले प्रपोज

बंगळुरू : महिला प्रीमियर लीगचा पाचवा सामना मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेलेला सामना आरसीबीने जिंकला.

आरसीबीचा हा सलग दुसरा विजय आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील संघाने गुजरातचा आठ गडी राखून पराभव केला. आरसीबीने पहिल्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा पराभव केला होता. या सामन्यात एक रोमांचक घटना घडली त्यामुळे क्रिकेट चाहते सुखावून गेले.

वास्तविक, सामन्यादरम्यान आरसीबीच्या अष्टपैलू खेळाडू श्रेयंकाला एका चाहत्याने लग्नाचा प्रस्ताव दिला. प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या एका व्यक्तीच्या हातात एक फलक होता, ज्यावर लिहिले होते, तू माझ्याशी लग्न करशील का? आरसीबीच्या डावाच्या सातव्या षटकात ही घटना घडली. दरम्यान टीव्ही स्क्रीनवर श्रेयंकाचा हा चाहता दिसताच आरसीबीचे खेळाडूही हसायला लागले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR