25.4 C
Latur
Wednesday, November 20, 2024
Homeलातूर‘आर्टी’ला राज्य शासनाची मंजुरी 

‘आर्टी’ला राज्य शासनाची मंजुरी 

लातूर : प्रतिनिधी
अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. राज्यातील मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना करावी, अशी मागणी करणारी लक्षवेधी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी मांडली होती. तसेच या मागणीसाठी लातूर शहरात लहुजी सेना संस्थापक अध्यक्ष अंगद वाघमारे यांनी दोन वेळा उपोषणही केले होते. ‘आर्टी’चे कार्यालय स्थापन झाल्याबद्दल लातुरात जल्लोष करण्यात आला.
अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापना करावी व मातंग समाजाच्या विविध विकासाच्या मागण्या मान्य व्हाव्यात, याकरीता लहुजी सेना संस्थापक अध्यक्ष अंगद वाघमारे यांनी दि. २२ जुलै २०२३ रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे लक्षवेधी उपोषण केले होते. त्या वेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी लक्षवेधी उपोषणाला भेट देऊन सरकारकडे मागण्याबाबत पाठपुरवा केला होता. त्यानंतर अंगद वाघमारे यांनी दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी याच मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. उपोषणादरम्यान वाघमारे यांची प्रकृती बिघडली. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापनेबाबत दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थिती केली होती. अखेर राज्य शासनाने दि. १ ऑगस्ट रोजी आर्टी कार्यालयाची स्थापना केल्याने लातुरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख मातंग समाजाच्या मागण्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल अंगद वाघमारे, अंगद वाघमारे, अमोल देडे, प्रा. नागनाथ विश्वंभर सुर्यवंशी, संपत गायकवाड, आप्पासाहेब देडे, संतोष जोगदंड, राजाभाऊ सगट, कल्याण शाहिर, अजित कांबळे यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR