22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरआशीवच्या आरोग्य उपकेंद्रास ग्रामस्थांनी लावले टाळे

आशीवच्या आरोग्य उपकेंद्रास ग्रामस्थांनी लावले टाळे

औसा : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील उजनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असलेल्या आशीव येथील उपकेंद्र सतत बंद राहात असल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत कल्पना देऊनही आरोग्य अधिकारी लक्ष देत नसल्याने सोमवार (दि.५) फेब्रुवारी रोजी सकाळी येथील ग्रामस्थांनी या आरोग्य उपकेंद्राला टाळे लावले असून वरिष्ठ अधिका-यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
ग्रामीण भागातील सर्व सामान्य लोकांना आरोग्य सेवा मिळावी या हेतूने उभारण्यात आलेले बरेच आरोग्य उपकेंद्र केवळ शोभेची वस्तू बनली आहेत.उजनी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणा-या आशीव उपकेंद्रांची आवस्था काही वेगळी नाही आठ ते दहा दिवसात कधीतरी उपकेंद्राला उघडण्याचा मुहूर्त लागतो. कर्मचारी राहत नाहीत अन वैद्यकीय अधिकारी फिरकत नाहीत, अशी आवस्था या उपकेंद्रांच झाली असल्याने रुग्णांना औसाकिंवा परिसरातील खाजगी रुग्णालयात जावून उपचार घेण्याची वेळ येते. अशावेळी आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास रुग्णांच्या पदरात पडत असल्याने उपकेंद्र काय कामाचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
ग्रामीण भागात सतत अनेक आजाराची साथ असते लहान बालकांना व वयोवृद्ध लोकांना याचबरोबर गरोदर मातांना वेळोवेळी उपचार व सल्ला आवश्यक असतो आशा वेळी गावातील शासकीय आरोग्य सेवा तत्पर असणे नितांत गरजेची असताना आशावेळी उपकेंद्रात सध्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR