19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयइंडिगो विमानाच्या टॉयलेटमध्ये धूम्रपान करणा-या प्रवाशाला अटक

इंडिगो विमानाच्या टॉयलेटमध्ये धूम्रपान करणा-या प्रवाशाला अटक

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईला जाणा-या इंडिगोच्या विमानातील एका प्रवाशाला टॉयलेटमध्ये धूम्रपान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या प्रवाशावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि विमान नियमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार इंडिगोचे १७६ प्रवाशांना घेऊन दिल्लीहून येणारे विमान २६ जून रोजी संध्याकाळी मुंबई विमानतळावर उतरण्याच्या आधी प्रवाशाने टॉयलेटमध्ये धूम्रपान केले होते.

दरम्यान, प्रवासी टॉयलेटमध्ये धूम्रपान करत असताना क्रू मेंबर्सला स्मोक सेन्सरद्वारे अलार्म ऐकू आला. त्यांनी स्वच्छतागृहाची पाहणी केली असता तेथे त्यांना सिगारेट आणि माचिसची काडी आढळून आली. यानंतर सदस्यांनी अधिका-यांना या घटनेची माहिती दिली. याबाबत त्यांनी प्रवाशांकडे विचारपूस केली असता, उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या खलील काजम्मूल खान नावाच्या प्रवाशाने धूम्रपान केल्याची कबुली दिली. खान हा फतेहपूरचा रहिवासी आहे.

यानंतर क्रू मेंबर्सनी मुंबई विमानतळावर उतरल्यावर आरोपी प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर या प्रवाशाला सहार पोलिस ठाण्यात नेण्यात आले. विमानाच्या टॉयलेटमध्ये प्रवाशाने धूम्रपान केल्याची ही पहिलीच घटना नाही. एप्रिलमध्ये जयपूरहून मुंबईला जाणा-या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये राजस्थानमधील रहिवासी असलेला प्रवासी टॉयलेटमध्ये धूम्रपान करताना आढळून आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR