22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयइंडिया आघाडीची मंगळवारी बैठक

इंडिया आघाडीची मंगळवारी बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जवळपास साडेतीन महिन्यानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक मंगळवार, १९ डिसेंबर रोजी दिल्लीत पार पडत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि संयुक्त जाहीरनामा या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर ही बैठक होणार आहे. त्यामुळे निकालाचे पडसादही या बैठकीत उमटू शकतात.
इंडिया आघाडीतील बैठकीत २७ पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. काँग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी सहभागी होणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला, पीडीपीकडून मेहबूबा मुफ्ती, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि आरएलडीचे जयंत चौधरी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अपना दलकडून (कमेरावादी) कृष्णा पटेल, जेडीयूकडून नितीश कुमार आणि आरजेडीकडून लालन सिंग, लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव, सीपीआयएमएलकडून दीपंकर भट्टाचार्य, सीपीएमकडून सीताराम येचुरी, सीपीआयकडून डी. राजा, तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, द्रमुक पक्षाचे एमके स्टॅलिन, मुस्लिम लीगचे कादर मोहिद्दीन आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन उपस्थित राहणार आहेत.
त्याशिवाय, केरळ काँग्रेसचे जोश के मणी, आरएसपीचे एनके प्रेमचंद्रन आणि व्हीसीकेचे थिरुमावलावन, एमडीएमकेचे वायको, केरळ काँग्रेसचे पीसी थॉमस जोसेफ, फॉरवर्ड ब्लॉकचे जी देवराजन, एमएमकेचे मोहम्मद जवाहिरुल्ला, ई.आर. शेकापचे जयंत पाटील आदी नेते दिल्लीतील बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणूक
एकजुटीने लढण्याचा निर्धार
इंडिया आघाडीची बैठक ऑगस्ट महिन्यात पार पडली होती. या बैठकीत आघाडीतील पक्षांनी एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. शक्य होईल त्या ठिकाणी भाजपविरोधात संयुक्त उमेदवार देण्यात येणार आहे. आघाडीने काही समित्यांचीही स्थापना केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR