16.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइम्रान खानला आणखी १४  तर पत्नीला ७ वर्षांची शिक्षा

इम्रान खानला आणखी १४  तर पत्नीला ७ वर्षांची शिक्षा

रावळपिंडी : वृत्तसंस्था
तुरुंगात बंद पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शुक्रवारी पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. १९० दशलक्ष पौंडच्या अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्तानी न्यायालयाने इम्रान खान यांना आणखी १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बुशरा बीबी यांना निकालानंतर लगेचच अडियाला तुरुंगातून अटक करण्यात आली. बुशरा बीबी हा निर्णय ऐकण्यासाठी तिथे उपस्थित होत्या. या निर्णयानंतर इम्रान खान समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. इम्रान खान यांना कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा दिली असून, त्याविरुद्ध ते उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. इम्रान खान व्यतिरिक्त त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
रावळपिंडीच्या कोर्टाने इम्रान खान यांच्या शिक्षेचा निर्णय दिला. इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून अदियाला तुरुंगात बंद आहेत. इम्रान खान यांच्याविरोधातील हा सर्वात मोठा खटला असून, त्यात हा निकाल देण्यात आला.
नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने डिसेंबर २०२३ मध्ये इम्रान खान, बुशरा बीबी आणि इतर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर १९० दशलक्ष पौंड (सुमारे ५० अब्ज पाकिस्तानी रुपये) नुकसान केल्याचा आरोप होता. हा पैसा, जो राष्ट्रीय तिजोरीत पोहोचला पाहिजे होता, तो वैयक्तिक फायद्यासाठी वापरला गेल्याचा आरोप करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR