30.3 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeलातूरईद-ए-मिनादुन्नबीनिमित्त भव्य रॅली 

ईद-ए-मिनादुन्नबीनिमित्त भव्य रॅली 

लातूर : प्रतिनिधी
ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त लातूर जिल्हा ईद-ए-मिलादुन्नबी जलसा कमिटीच्या वतीने दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता लातूर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली होती.  या रॅलीचा शुभारंभ शहरातील न्यू. काजी मोहल्लातील सोफिया मस्जिद येथुन झाला. रॅली शहरातील  छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, सम्राट चौक, महात्मा गांधी चौक, मुख्य मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, संविधान चौक व तेथून परत छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, गंजगोलाई, अण्णा भाऊ साठे चौक, ६० फुट रोडवरील मरकज-ए-रजा उर्दु् शाळेत रॅलीचा समारोप झाला.
रॅलीत ईद-ए-मिलादुन्नबी जलका कमिटीचे अध्यक्ष महेबुब काजी, उपाध्यक्ष नुरअली, आवजे कुरेशी, युनूस शेख, सरफराज पठाण, सलीम रजा कुरेशी, सफराज मणियार, फकीर मिस्त्री, यासीन कच्छी, मुस्तफा शेख, मुस्तफा घंटे, नसीर शेख, रहेमतुल्ला मिस्त्री, मुर्तुूजा शेख यांच्यासह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, अशी  माहिती लातूर जिल्हा ईद-ए-मिलादुन्नबी जलसा कमिटीचे संस्थापक सचिव उमरदराज खान यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR