22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरउघड्या डीपी बनल्या ‘डेंजर झोन’

उघड्या डीपी बनल्या ‘डेंजर झोन’

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरामध्ये अनेक ठिकाणी महावितरणच्या डीपी उघड्या आहेत. त्यामुळे जीथे जीथे अशा डीपी आहेत तो परिसर ‘डेंजर झोन’बनला आहे. महावितरणकडून याकडे लक्ष दिले जात नाही. एवढेच नव्हे तर काही नागरिकांनी या उघड्या डीपीविषयी महावितरणकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नाही. महावितरण नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत आहे, असे एकंदर परिस्थितीवरुन स्पष्ट होते.
शहरातील महवितरण्या डीपीच मुळात रस्त्याच्या कडेला बसविलेल्या आहेत. काही डीपी या सार्वजनिक ठिकाणीही आहेत. डीपींचे दरवाजे बसवणे, ते लावणे, त्याची देखभाल दुरुस्ती करणे याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची असताना महावितरणकडू मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे. उघड्या डीपींबाबत महावितरणला गांभीर्य दिसत नाही. डीपीवर ‘डेंजर’(धोका), असे लिहिलेले असते. खत-याची सचित्र सूचना देण्यात येते. मात्र महावितरणकडूनच ‘डेंजर’च्या सूचनेची पुर्णत: वाट लावली जात आहे. डीपींचे दरवाजे सताड उघडे पडलेले आहेत. काही ठिकाणच्या डीपींचे दरवाजेच गायब आहेत.
अनेक ठिकाणी डीपींच्या डाव्या व उजव्या बाजूंवर विविध जाहिरातींचे पॅपलेट डकलेले दिसून येत आहेत. एवढेच नव्हे तर या उघड्या डीपींजवळ नकळत वाहने लावणे, गुरांना बांधणे, घरातील मोडके तोडके सामान टाकणे, असे प्रकार सर्रास दिसून येत आहेत. अशा ठिकाणी डीपींना दरवाजा नसल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या कडेला लहान मुलं खेळत असतात. अशा ठिकाणी उघड्या डीपी ‘डेंजर’ ठरु शकतात.  या गोष्टीकडे महावितरणच्या यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR