शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
हिसामाबाद (उजेड ) ता. शिरूर अनंतपाळ जि. लातूर येथील सर्वधर्मियासाठी राष्ट्रीय सण असलेल्या अनोख्या गांधीबाबा यात्रेची कुस्त्या नंतर मोठ्या उत्साहात सांगता झाली. या गांधीबाबा यात्रेस परिसरातील ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. जंगी कुस्त्या, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व अनेक उपक्रमामुळे गेल्या सात दशकभरातील सर्वात मोठी यात्रा या वर्षी भरली होती. या गांधीबाबा यात्रेत परिसरातील नागरिकांसह बाहेरगावी असेलेली भूमीपुत्र व तसेच सासूरवाशीण मुलीसह अबालवृद्ध या यात्रेत सहभागी झाल्याने गांधीबाबा यात्रेची मोठी रंगत वाढली.यात्रेची सांगता झाली असली तरी पुढील यात्रेची ओढ उजेडवासीयांच्या मनामध्ये दिसत होती.
यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या जंगी कुस्त्यामध्ये महाराष्ट्रासह सिमावर्ती भागातील मल्ल या कुस्त्यामध्ये सहभागी झाल्याने कुस्त्यामध्ये मोठी रंगत निर्माण झाली होती. शेवटी झालेल्या दिपक सगरे भूसणी व गणेश साळुंके वायगाव यांच्या चुरशीच्या कूस्तीत दिपक सगरे विजेता ठरले आहेत. गगनचुंबी पाळणे, खेळणीचे स्टॉल, यात आबालवृद्धांनी धमाल करत यात्रेत रंगत भरली. या अनोख्या गांधीबाबा यात्रेला दिवाणी न्यायाधिश व स्तर निलंगा न्यायमूर्ती शेख,पत्रकार महेंद्र जोंधळे, गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण, एबीडीओ शिवाजी यमुलवाड, विस्तार अधिकारी डी.बी.व्होट्टे, पोलिस निरीक्षक विठ्ठलराव दराडे,अस्थी रोग तज्ज्ञ डॉ. संतोष बिरादार, पीएस आय चंदनंिसह परिहार, हासेगाव सेवालयाचे रवि बापटले यांनी शंभर विद्यार्थ्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देऊन गांधीबाबाचे दर्शन घेतले. बीट जमादार गोंिवद मलवाड व त्यांच्या सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. येणा-या सर्व पाहुण्याचे यात्रा कमिटीचे संयोजक, सहसंयोजक ग्रामपंंचायत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य,यात्रा कमिटीचे पदाधिकारी सर्व सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेत त्यांचे स्वागत करून यात्रेची माहिती दिली.