16.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeराष्ट्रीयउत्तर प्रदेशात मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग, १० बालकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात मेडिकल कॉलेजमध्ये भीषण आग, १० बालकांचा मृत्यू

झाशी : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील झाशीत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये आग लागल्याने १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला असून १६ बालके गंभीररीत्या जखमी झाली आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वॉर्डात शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमधील नवजात शिशु वॉर्डमध्ये काल रात्री भीषण आग लागली. या आगीत या वॉर्डमधील १० नवजात बालकांचा मृत्यू झाला तर १६ जखमी झाले आहेत. यातील ३७ बालकांना खिडकीच्या काचा तोडून वाचवण्यात आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. आगीची घटना घडताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. मुलांचे पालक आक्रोश करत बाळांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते.

दरम्यान, अग्निशमन दलाने ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढले. ही दुर्घटना घडली, या वॉर्डमध्ये एकूण ५४ नवजात बालके होती. या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले.

नर्सने काडीपेटीची काडी पेटवली?
एका नर्सने ऑक्सिजन सिलिंडरच्या पाईपला जोडण्यासाठी काडीपेटीची काडी पेटवली आणि आग लागली. यानंतर संपूर्ण वॉर्डने पेट घेतला. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किट हे कारण सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात काडीपेटीमुळे आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR