23.6 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeलातूरउदगिरात २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत युवा महोत्सव

उदगिरात २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत युवा महोत्सव

उदगीर : प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचलनालय व कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र युवा राज्य महोत्सव दि.२९ ते ३१ डिसेंबर रोजी, तालुका क्रीडा संकुल उदगीर येथे होणार असल्याची माहिती क्रीडा युवक संचालनालयाचे उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नात लकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी केंद्र शासनाच्या वतीने ‘राष्ट्रीय युवा महोत्सव’ आयोजित करण्यात येतो. राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये राज्याचे प्रातिनिधिक संघ सहभागी करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यावर्षीचा राज्यस्तरीय युवा महोत्सव घेण्याचा बहुमान उदगीर शहराला मिळाला आहे.

या युवा महोत्सवाचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ३० डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता उदगीर शहरातील तालुका क्रीडा संकुल (जिल्हा परिषद मैदान), उदगीर येथे करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील, जिल्ह्याातील नामवंत खेळाडु, कलाकार, पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे क्रीडा व युवक संचालनाचे उपसंचालक युवराज नाईक व जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या महोत्सवात जवळपास १३ समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व फोटोग्राफी, महाराष्ट्र राज्यासाठी विज्ञानातून तृणधान्य वाढीसाठी विकास व समाज्यासाठी विज्ञान या संकल्पनेवर होणार आहेत. हस्तकला, वस्त्रोद्योग, अग्रो प्रोडक्ट अशा प्रकारामध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या आठ विभागातून सुमारे ८०० कलाकार सहभागी होतील. महोत्सवातील विविध बाबींच्या परीक्षणासाठी राज्यभरातून तज्ञ कलावंतांना पाचारण करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत लोदगेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR