20 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeलातूरउदगीरात २८ जानेवारीस राष्ट्रीय लघुपट महोत्सव

उदगीरात २८ जानेवारीस राष्ट्रीय लघुपट महोत्सव

उदगीर : प्रतिनिधी
रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित ८ वे आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सावाचे आयोजन दि २८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वा शिवाजी महाविद्यालय ,उदगीर  येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात लघुपट  प्रथम  २१००० रु. दिलीपकुमार राजेंद्र गायकवाड  यांच्या वतीने, द्वितीय ११००० रु.  मनोज पुदाले यांच्या वतीने, दिग्दर्शन  प्रथम ३००१ रु. द्वितीय २००१ डॉ दिपक सोमवंशी यांच्या वतीने, पुरुष अभिनय प्रथम ३००१ रु द्बितीय २००१ रु.  सतिश उस्तुरे यांच्या वतीने,  स्त्री अभिनय प्रथम ३००१ रु. द्वितीय २००१ रु अ‍ॅड दत्ताजी पाटील यांच्या वतीने, कथा व संवाद प्रथम ३००१ रु  व द्वितीय  वतीने २००१ रु अनिल मुदाळे यांच्या वतीने, बाल कलाकार प्रथम ३००१ रु  व द्वितीय २००१ रु.  प्रजित व प्रणिता याच्या स्मृती प्रीत्यार्थ  डॉ.  पांडूरंग कलंबरकर यांच्या वतीने, प्रा उदयंिसंह विठ्ठलराव पाटील यांच्या वतीने लघुपटासाठी दोन लघुपटासाठी उत्तेजनार्थ  ३००० रु. व २००० रु  ठेवण्यात आली आहेत सहभागी लघुपटांना  गौरव चिन्ह व  सन्मानचिन्ह  देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी  लघुपट ३ ते ३० मिनिटापर्यंतचा असावा, लघुपटाचा डाटा क्रप्ट  झाल्यास संयोजक जबाबदार रहाणार नाहीत. पारितोषिक प्राप्त महाराष्ट्रातील लघुपट निर्मात्यांना  पारितोषिक स्विकारण्यासाठी उपस्थित रहावे लागेल. ९८२३१६०५५२ या वॉट्सप  क्रमांकावर  दि २५ जानेवारी २०२४ पर्यत फिल्म  पाठवावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष  प्रा बिभीषण मद्देवाड ,सचिव प्रा ज्योती मद्देवाड अ‍ॅड. विष्णू लांडगे,अ‍ॅड.  महेश मळगे, रसूल दा पठान, रवींंद्र हासरगुंडे, रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे, मारोती भोसले, महादेव खळूरे, संदीप मद्दे, सिद्घार्थ सूर्यवंशी, सचीन शिवशेट्टे, प्रल्हाद येवरीकर,जहाँगीर पटेल, निता मोरे ज्ञानेश्वर बडगे, विवेक होळसंबरे  टी. डी. पांचाळ, बालाजी भोसले, अर्चना पाटील ,  हणमंत केंद्रे , नागनाथ गुट्टे आदीनी  केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR