32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeलातूरउदगीर येथे लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपचा शानदार शुभारंभ

उदगीर येथे लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपचा शानदार शुभारंभ

उदगीर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियन टी २० ग्रामीण  स्पर्धेला उदगीर तालुक्यातील संघांचे उदगीर येथे १७ मे रोजी शानदार सोहळ्यात शुक्रवार  सायंकाळी ५.३० वाजता  जिल्हा महिला काँग्रेसच्या जि़ल्हाध्यक्षा शिलाताई पाटील यांच्या हस्ते उद्घाट्न करण्यात आले. शुभारंभाच्या सामन्यात भाऊ वॉरियर्स व यंग ब्राईज क्रिकेट संघ यांच्यात सामना झाला. त्यात भाऊ वॉरियर्स संघाने ६७ धावांने यंग ब्राईज संघाला पराभूत केले. शुभारंभ सामन्यात खेळाडूंनी मोठी गर्दी केली होती.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उषा कांबळे, सरचिटणीस प्रदेश महिला काँग्रेस, काँग्रेस शहराध्यक्ष मंजूर पठाण, अ‍ॅड. पदमाकर उगिले, बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, श्रीकांत कल्याणराव पाटील, विपीन जाधव, नाना ढगे, प्रा. गोंिवद भालेराव, युवक शहराध्यक्ष बंटी कसबे, आशिष पाटील राजूरकर, अमोल घुमाडे, नागनाथ भूषणवाड, श्रीनिवास एकुर्केकर, फयाज डांगे, असरार शेख, सतीश पाटील मानकीकर, सदाम बागवान, भास्कर पाटील, राजेश्वर भाटे, कपिल शेटकार, प्रा जामकर, कनिष्क शिंदे, प्रीतम गोखले, पप्पू अत्तार, प्रदीप पवार, सरपंच सोमनाथपूर मिथुन शिंदे, रोहन यांनालले, संजय होनराव, अलीम शेख, श्रीकांत शिंदे यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मोठया संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.शुभारंभाचा सामना बघण्यासाठी उदगीर शहर व तालुक्यातील युवकांनी मोठी गर्दी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR