32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रउदयनराजे विजयी

उदयनराजे विजयी

सातारा : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक मतमोजणीत राज्यातील पहिला निकाल हाती आला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले विजय ठरले आहेत. उदयनराज भोसले यांनी ठाकरे गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे याचा पराभव केला. विजयानंतर उदयनराजे भावूक झाले.

२००९ मध्ये उदयनराजे भोसलेंनी शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांचा तब्बल ३ लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला होता. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष पुरुषोत्तम जाधवांना साडे तीन लाख मतांनी पराभवाचं पाणी पाजले. २०१९ मध्ये शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा धुव्वा उडवून उदयनराजेंनी विजयाची हॅटट्रिक केली.

मात्र अवघ्या ३ महिन्यात राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शरद पवारांच्या भर पावसातल्या सभेनं अख्ख्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बदलून टाकलं. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी भाजपच्या उदयराजेंना तब्बल ८७ हजार मतांनी धूळ चारली होती

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR