22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेले, त्यावेळेस गप्प का ?

उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेले, त्यावेळेस गप्प का ?

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर निघालेले मनोज जरांगे यांनी संचारबंदी लागू केल्यावर भांबेरी गावातून अंतरवाली सराटीत परत फिरले. यातच भाजपचे आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार करताना प्रतिप्रश्न केला आहे.

मनोज जरांगेंची अशी भाषा मराठा समाजाला मान्य नाही. जे बोलतात त्या मागे स्क्रिप्ट कोणाची आहे? मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेले त्यावेळी तुम्ही गप्प का बसता? शरद पवार इतकी वर्षे आरक्षण देऊ शकले नाही त्यावेळी गप्प का बसला? अशी विचारणा आशिष शेलार यांनी यावेळी केली.

दरम्यान, मनोज जरांगे अंतरवाली सराटीत परत गेले आहेत. तसेच एक बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. आंदोलकांनी शांत राहावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. तसेच वैद्यकीय उपचार घ्यायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, संचारबंदी उठवा, मुंबईला येणारच. रात्री काय डाव शिजला होता, याची कल्पना होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहाणे व्हावे. आमच्या सहका-यांना पोलिसांनी सोडावे. मी ंिजकलो, देवेंद्र फडणवीस हरले. सगेसोयरे याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. देवेंद्र फडणवीसांविरोधात नाराजीची प्रचंड लाट उसळेल. देवेंद्र फडणवीसांनी असले धंदे बंद करावेत. देवेंद्र फडणवीसांना सुट्टी नाही. देवेंद्र फडणवीसांना आता हरवायचे आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही. राज्यासह देशात त्यांना अडचणीत आणू. जनतेचा अंत पाहू नये. संचारबंदी लावून सरकार चालवण्यात कसली मर्दानगी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात दम नाही, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली. या टीकेला भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR