27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरउद्यान बनले कच-याचे आगार

उद्यान बनले कच-याचे आगार

लातूर : प्रतिनिधी
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेंडकर पार्क परिसरातील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या उद्यानातच कच-याचे डंपिंग ग्राऊंड बनविण्यात आले आहे. झाडांचा पालापाचोळा, नागरिकांनी टाकलेल्या अन्न पदार्थांचा कचरा उद्यानातच साठवला जात असल्यामुळे हा कचरा कुजून दुर्गंधी सुटली आहे. शुद्ध हवेसाठी उद्यानात आलेल्या नागरिकांना उद्यानातील कच-याची दुर्गंधी सहन करावी लागत आहे. याकडे महानगरपालिका प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
लातूर शहर झपाट्याने विकसीत होत असले. लातूर शहरात सार्वजनिक मोकळ्या जागा खुप कमी आहेत. त्यामुळे उद्यानांची संख्याही कमीच आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क परिसरात खुप जुने उद्यान आहे. काही वर्षांपुर्वी हे एकमेव उद्यान होते. जे ‘मनोहर उद्यान’ या नावाने ओळखले जायचे. आज या उद्यानाच्या परिसराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क असे म्हटले जाते. या उद्यानात खुप जुनी झाडं आहेत. मोठी झाड असल्यामुळे उद्यानात झाडाची सावलीही ब-यापैकी असते. सध्या उन्हाळयाचे दिवस असल्यामुळे दुपारी आणि सायंकाळी विरंगुळा आणि शुद्ध हवेसाठी नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिक या उद्यानात मोठ्या प्रमाणात येतात. परंतू, या नागरिकांना उद्यानातील गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
या उद्यानात विरुगूळा करण्यासाठी नागरिक, अभ्यासासाठी विद्यार्थी  तर अनेक जण हितगुज, गप्पा गोष्टी करण्यासाठी येत असतात. उद्यानात झाडांची संख्या ब-यापैकी असल्यामुळे झाडांचा पालापाचोळा गळून पडतो. नागरिकांनी आणलेल्या खाद्य पदार्थाचा कचराही असतोच. परंतू, उद्यानातील कर्मचारी उद्यानाची झाडलोट करताना सर्व कचरा एकत्र करुन उद्यानाच्या एका कोप-यात जमा करतात. हा जमा झालेला कचरा मात्र कोणीच उचलत नाही. परिणामी उद्यानात कच-याचे डंपिंग ग्राऊंड निर्माण झाले आहे. कचरा आणि कच-यातील अन्नपदार्थ कुजून उद्यानात दुर्गंधी पसरली आहे. कमालीची दुरावस्था झाली आहे. येथे येणा-या नागरिकांना कच-याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्यांकडे महापालिकेचे कमालीचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR