23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeउद्योगपती रतन टाटा यांना अणुव्रत पुरस्कार

उद्योगपती रतन टाटा यांना अणुव्रत पुरस्कार

मुंबई : वृत्तसंस्था
अणुव्रत विश्व भारती द्वारे दिला जाणारा २०२३ सालचा प्रतिष्ठेचा अणुव्रत पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. अणुव्रत विश्व भारती सोसायटीचे अध्यक्ष अविनाश नाहर यांच्या समवेत अणुविभाचे महामंत्री भीखम सुराणा, मुंबईचे सीमा शुल्क आयुक्त अशोक कुमार कोठारी, अणुविभाचे उपाध्यक्ष विनोद कुमार, सहमंत्री मनोज सिंघवी उपस्थित होते. पुरस्कार स्वरूपात स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्रासह १,५१ लाख रूपये रतन टाटा प्रदान करण्यात आले.

गेल्या ७५ वर्षापासून अणुव्रत आंदोलन मानवीय एकता, नैतिकता, अहिंसा आणि सद्भावनाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देत आहे. आचार्य तुलसी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या चळवळीने संयुक्त राष्ट्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी सर्वश्री. आत्माराम, जैनेंद्रकुमार, शिवाजी भावे, शिवराज पाटील, नीतिशकुमार, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. मनमोहन सिंग, टी. एन. शेषन, प्रकाश आमटे आदी मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, अशी माहिती महामंत्री भीखम सुराणा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR