चंद्रपूर : प्रतिनिधी
चंद्रपूर शहरातून अपघाताची एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंद्रपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर-भोयगाव-चंद्रपूर मार्गावरील लखमापूर येथे आज पहाटेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला या भरधाव कारने जबर धडक दिली आहे.
तर या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिस पुढील कायदेशीर प्रक्रिया करत असून गंभीर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.